नागपूर रेल्वेस्थानकावरुन तीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार

20 Jan 2026 22:13:58
लोक प्रतिनिधींचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे
नागपूर,
देशातील पहिल्या Vande Bharat sleeper trains वंदे भारत स्लीपर ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता लोक प्रतिनिधींनी मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरुन तीन वंदे भारत स्लीपरची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने नागपूर ते नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते दिल्ली पर्यंतच्या प्रवासाकरिता वंदे भारत स्लिपर ट्रेनची मागणी करण्यात आली असून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाने सुध्दा एक प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे यापूर्वीच पाठविला असल्याने आगामी काळात नागपूर रेल्वेस्थानकावरुन तीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती लोकप्रतिनिधींनी दिली आहे.
 
 
vande-bharat-sliper
 
आढावा बैठकीत विषयांवर चर्चा
नागपूर विभागाच्या अधिकार क्षेत्रातील खासदारांसोबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत हॉटेल तुली, सदर येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नागपूर विभागाअंतर्गत येत असलेल्या मार्गावरुन तीन वंदे भारत स्लीपर कोच सुरु करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींची चर्चा झाली. मुख्यत: लांबच्या प्रवासाकरिता वातानुकूलित ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ची गरज व्यक्त करीत आमदार कृष्णा यांनी ही मागणी रेटून धरली. यात प्रामुख्याने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनचे मुख्यालय बिलासपूर येथे असल्याने गैरसोयींचा सामना करावा लागतो. मध्यवर्ती नागपुरात झोन कार्यालय असावे, अशी मागणी कृष्णा खोपडे यांनी केली.
 
 
अमृत भारत स्टेशनअंतर्गत विकास कामे
खासदार -महाव्यवस्थापकांच्या बैठकीत प्रवासी सुविधा, अमृत भारत स्टेशन, नवीन थांबे, रेल्वेच्या विविध विकास चर्चा करण्यात आली. याप्रसंगी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश, खासदार नितीन गडकरी यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार कृष्णा खोपडे, खासदार बंटी विवेक साहू, रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे, भंडारा गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, डॉ. फग्गन सिंग कुलस्ते, आमदार अंजनी तिवारी, विनोद खांडेकर, खासदार संतोष पांडे, अमय निनावे, नामदेव किरसन यांचे प्रतिनिधी, खासदार अभय कोचर, खासदार जी.एस. ठाकूर, दीपक कुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
पुणे, मुंबई आणि दिल्ली मार्गावर गरज
Vande Bharat sleeper trains  वंदे भारत स्लिपर ट्रेन जास्तीत जास्त १६० किमी प्रति तास वेगाने धावत असल्याने प्रवासाचा वेळ वाचतो. पुणे, मुंबई आणि दिल्ली मार्गावर प्रवासी संख्या सर्वाधिक असल्याने लोकप्रतिनिधींकडून तीन अधिक वंदे भारत स्लिपर ट्रेनची मागणी केली आहे. मात्र पहिल्या टप्प्यात किमान तीन वंदे भारत स्लिपर ट्रेन सुरु करावे, अशी मागणी करणारे पत्र रेल्वे मंत्रालयाकडे दिले आहे.
 
गरम पाण्याच्या शॉवरची सोय
वंदेभारत स्लिपरचे कोच बेंगळुरु येथील फॅक्टरीत तयार झाले असून यात टक्कर प्रतिबंध प्रणाली असल्याने दोन गाड्यांची टक्कर होऊन भीती नाही.तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी यात विशिष्ट पद्धतीचे बर्थ तसेच शौचालय तयार करण्यात आले आहेत. शौचालयात दुर्गंधी येणार नाही, अशी प्रणाली वंदेभारत स्लिपर कोचमध्ये बसविण्यात आली आहे. प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी मोठा कक्ष तयार करण्यात आला असल्याने सर्व सामान स्वत:जवळ घेऊन बसण्याची गरज नाही.याशिवाय लोकोपायलटसाठी लोकोकॅबमध्येच शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. वंदेभारतच्या फ्सर्ट क्लासमध्ये गरम पाण्याच्या शॉवरची सोय करण्यात आली असल्याने रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी प्रवाशी आंघोळ करूनच गाडीतून उतरू शकतील.
Powered By Sangraha 9.0