विवेकानंद ज्येष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन

20 Jan 2026 16:02:17
नागपूर,
Vivekananda Senior Citizens Board विवेकानंद ज्येष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन शनिधाम, नरेंद्र नगर, नागपूर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविण कोटीया तर प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राध्यापक भाऊराव बिरेवार उपस्थित होते. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी दरवर्षीप्रमाणे ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
uday
 
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मंडळाच्या सदस्यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती सादर केली तसेच गीते, भजने व कवितांचे सादरीकरण झाले.प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद भागडे यांनी केले.Vivekananda Senior Citizens Board कार्यक्रमाचे संचालन अजय बावडेकर व अभय वैरागकर यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय वैरागकर यांनी करून दिला. सचिव उदय दिवे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. आभार प्रदर्शन रामनारायण गुप्ता यांनी केले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य : उदय दिवे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0