भाजपा व शिवसेना उबाठा नगरसेवकांची वर्णी
वाशीम,
Washim Corporator नगर परिषदेतील विविध विषय समित्या व स्थायी समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणुक २० जानेवारी पार पडली असून, यामध्ये सर्व सभापती व स्थायी समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. यामध्ये भाजपा व शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. नव्या पदाधिकार्यांच्या नियुक्तीमुळे नगर परिषदेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, असा आशावाद मतदारांनी व्यक्त केला आहे.
Washim Corporator न.प. आरोग्य समितीच्या सभापतीपदी शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान उपाध्यक्ष राजू भांदुर्गे यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीची धुरा भाजपाचे राहुल तुपसांडे यांच्याकडे देण्यात आली असून, शिक्षण समितीच्या सभापतीपदी भाजपाचे कुणाल हेडा तर नियोजन समितीच्या सभापतीपदी भाजपा पक्षाच्या अरुणा वाटाणे यांची नियुक्ती करण्यात आली. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी शिवसेना उबाठा गटाच्या वर्षा हजारे, महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपाच्या गोकुळाबाई इंगोले, उपसभापती म्हणून शिवसेना उबाठा गटाच्या पूजा विशाल काळे यांची म्हणून निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे अनिल ताजने, भाजपाच्या जयश्री संतोष वानखेडे व शिवसेना उबाठा गटाचे साबीर मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Washim Corporator नव्या पदाधिकार्यांच्या नियुक्तीमुळे वाशीम शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर प्रभावी उपाय होतील आणि नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता येईल, अशी आशा वाशीम नगर परिषदेच्या अध्यक्षपदी अनिल केंदळे यांनी जनतेतून बहुमताने विजय मिळविला आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेना उबाठा गटाचे राजू भांदूर्गे यांची अविरोध निवड करण्यात आली. विषय समिती सभापती व स्थायी समिती सदस्यपदी भाजपा व शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांची निवड करण्यात आली. यामध्ये एमआयएम व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना कुठेही स्थान मिळाले नाही. नगर परिषदेच्या संख्याबळाचा विचार करता भाजपा पक्षाचे १४, शिवसेना उबाठा १३ नगरसेवक, काँग्रेस २, एमआयएम २ व अपक्ष १ असे संख्याबळ आहे. मात्र, भाजपा व शिवसेना उबाठा पक्षाने एकत्र येत वाशीम नगर परिषदेवर आपले वर्चस्व स्थापन केल्याने इतर पक्षाच्या नगरसेवकांचा अपेक्षाभंग झाला आहे. नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीला निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी कामकाज पाहीले. यावेळी नगरसेवकासह भाजपा, शिवसेना पदाधिकार्यांची उपस्थिती होती.