जिल्हा परिषदा निवडणुकीत राजकीय रणधुमाळी; पक्षप्रवेश-मनोमिलनाची धडक

20 Jan 2026 15:28:15
पुणे,
Zilla Parishad Election : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिरूर लोकसभेतील आंबेगाव तालुका वगळता इतर ठिकाणी दोन्ही पक्ष घड्याळ या एकाच चिन्हावर लढणार असल्याची माहिती शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली.
 
 

ai photo 
 
 
सोमवारचा दिवस राजीनामा, पक्षप्रवेश आणि नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात गेला. भाजपने शिंदेसेनेसोबत संधान साधून जागांसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादीत दाखल झाले, तर माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे राष्ट्रवादीची साथ सोडली. माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी समजूत काढण्यात दिवस गेला.
 
दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनामुळे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले असून, खास करून उत्तर पुण्यात हे स्पष्ट दिसत आहे. या संधीचा फायदा उचलत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे आणि उद्धवसेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली खंडागळे शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. जुन्नरमध्ये महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी झाल्यामुळे उमेदवारीची शक्यता धूसर झाली असून, दुरावलेले नेते लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0