आधी पादचार्याला उडवले, नंतर स्वतःच उलटले वाहन
मूल,
Accident near Nandgaon तेलंगणा राज्यातून रोवणी करून परत येणार्या प्रवाशांनी भरलेले पिकअप वाहन पादचार्याला धडक दिल्यानंतर उलटले. यात पादचार्यासह दोघे जण ठार, तर 17 जण जखमी झाले. ही घटना बुधवार, 21 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नांदगाव येथे लक्की बारच्या बाजूला घडली. हरिदास विलास मेटपल्लीवार (35) व भिकारू मरस्कोल्हे (40, रा. डोंगरहळदी, ता. पोंभुर्णा) अशी मृतकांची नावे आहे.

तेलंगणा राज्यातून रोवणी करून प्रवाशी पिकअप वाहनाने (एमएच 34 बीझेड 3127) स्वगावी परतत होते. यावेळी हरिदास विलास मेटपल्लीवार (35) यांना पिकअप वाहनाने मूल तालुक्यातील नांदगाव येथील लक्की बारच्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत हरिदास मेटपल्लीवार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक खांबाला वाहनाची जोरात धडक बसली. त्यामुळे पिकअप वाहन पलटले. यात वाहनातील वनिता भिकारू मरस्कोल्हे (40, रा. डोंगरहळदी, ता. पोंभुर्णा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर 17 प्रवासी जखमी झाले. यातील 7 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून, उर्वरित जखमींवर मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Accident near Nandgaon गंभीर जखमीमध्ये अनिता गिरिधर वरठे (45, रा. चिंधीमाल, ता. नागभीड), शालू सुखदेव नैताम (34, रा. खातेरा, ता. चिमूर), प्रेमीला देवानंद वेलादी (35, रा. पीपरहेटी, ता. सिंदेवाही), बंडू लक्ष्मण कुमरे (36, रा. खातेरा, ता. चिमूर), मारोती माणिक वरठे (51, रा. चिंधीमाल, ता. नागभीड), पौर्णिमा मारोती वरठे (36, रा. चिंधीमाल, ता. नागभीड), निरंजना अनिल उरकुडे (29, रा. पांझरेपार, ता. नागभीड) यांचा समावेश आहेत.
तर, मूल उपजिल्हा रुग्णालय येथे जखमी असलेले मयुरी मारोती मडावी ((20, चिंधीमाल, ता. नागभीड), लीला विनोद कुळमेथे (27, रा. पीपर्डा, ता. चिमूर), किरण जितेंद्र मडावी (27, रा. चिंधीमाल, ता. नागभीड), शालिक शामराव मंगाम (45, रा. पीपरहेटी, ता. सिंदेवाही), विनोद मनोहर कुळमेथें (30, रा. पीपरहेटी, ता. सिंदेवाही), कौशल्या सोनू कोडापे (40, रा. सिरकडा, ता. चिमूर), संगीता हरिदास मडावी (45, रा. फुलझरी, ता. मूल), रागिना नितेश कोयचाळे (27, रा. खातेरा, ता. चिमूर), आशा शालिक मंगाम (40, रा. पीपरहेटी, ता. सिंदेवाही), ईश्वर मारोती कन्नाके (58, रा. पोटनपूर) हे उपचार घेत आहेत.
Accident near Nandgaon घटनेची माहिती कळताच मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहन चालक अंकुश नागोराव राचलवार (28, रा. गिरगाव, ता. नागभीड) याला ताब्यात घेतले असून, अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून, त्याच्या आधारे तपास करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात मूल पोलिस करीत आहेत.