बंजारा लेंगी, तीज आदी कार्यक्रमांद्वारे प्राथमिक शिक्षकांनी केले संस्कृतीचे प्रदर्शन

21 Jan 2026 17:56:10
मानोरा, 
गेल्या १७ जानेवारीपासून वाशीम येथील क्रीडा संकुलन मध्ये जिल्हा परिषद च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी व शिक्षिकांनी बंजारा पेहराव परिधान करून लेंगी नृत्याचे सादर करुन गौरवशाली इतिहास असलेल्या Banjara culture बंजारा संस्कृतीची ओळख करून दिली.
 

banjara 
 
वाशीममध्ये १७ ते १९ जानेवारी दरम्यान जिपच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीने गौरवशाली इतिहास असलेल्या बंजारा संस्कृतीचे लेंगी नृत्य, तिज नृत्य व जूने भजन सादर केले. कार्यक्रमासाठी मानोरा तालुक्यातील शिक्षक व शिक्षिकांनी अथक परीश्रम घेतले. मानोरा तालुक्यातील शिक्षक व शिक्षकांनी Banjara culture बंजारा संस्कृती व नगारा भवन अशी थीम ठेवून सुरुवातीला जुने भजन व नंतर शिक्षकांनी तीज नृत्य सादर केले. शेवटी जवळपास २५ शिक्षकांनी लेंगी नृत्य सादर केले.
Powered By Sangraha 9.0