हिंगणघाट,
Distribution of educational materials दे. सि. हेमके गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, वर्धाच्या वतीने स्व. कमलबाई देवरावजी हेमके यांच्या स्मृतिदिन व स्व. रमेश नारायण धात्रक यांच्या जयंतीनिमित्त स्पंदन वसतिगृह, हिंगणघाट येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून हिंगणघाट नपचे नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, नगरसेवक रवीला आखाडे, संचालक मंडळ लोणारे, हेमके आदी मान्यवर उपस्थित होते.
Distribution of educational materials गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला हातभार लावणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा हा उपक्रम खर्या अर्थाने समाजहिताचा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून संधीची समानता निर्माण होते आणि उज्ज्वल भविष्यासाठी भकम पायाभरणी होते. स्मृतिदिन व जयंतीनिमित्त राबवलेले असे उपक्रम मूल्यांची जपणूक करत समाजाला सकारात्मक दिशा देतात. या स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष सुहासिनी घुडे, प्रा. राजीव धात्रक व आयोजकांचे आभार व्यत करण्यात आले.