जम्मू-काश्मीरमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के!

21 Jan 2026 10:57:54

Earthquake
 
जम्मू,
Earthquake in Jammu and Kashmir जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात मंगळवारी रात्री सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, २० जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:२९ वाजता ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू ३२.८९° उत्तर अक्षांश आणि ७५.९७° पूर्व रेखांशावर असून, ४७ किलोमीटर खोलीवर होता. भूकंप डोडा परिसरातील आणि आजूबाजूच्या लोकांना जाणवला, परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त आलेले नाही.
Powered By Sangraha 9.0