फडणवीसांच्या बचावात उतरली पत्नी; राऊत यांना दिले सडेतोड उत्तर

21 Jan 2026 18:24:49
मुंबई,  
fadnavis-wife-comes-to-defense राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापौर कोण होणार यावर लक्ष लागले आहे. 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महापौरपदांच्या आरक्षणाची माहिती गुरुवार, 22 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. आरक्षण नव्याने शून्यापासून ठरवले जाणार नाही; मागील आरक्षणानुसार चक्राकार पद्धतीने आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
 
fadnavis-wife-comes-to-defense
 
दरम्यान, देशातील मुख्यमंत्री दावोसमधील आंतरराष्ट्रीय औद्योगिक परिषदेत सहभागी आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती की, “देशभरातील मुख्यमंत्र्यांची पिकनिक दावोसला सुरु आहे. नंतरच ते महापौर निवडणुकीकडे लक्ष देतात.” राऊत म्हणाले की, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देशात भेट न देता दावोसमध्ये एकत्र येऊन करार करत आहेत, तेही जनतेच्या पैशाच्या करावर. त्यांनी पंतप्रधानांना यावर लक्ष द्यावे असे आवाहन केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांचे दावोस प्रवास गुंतवणूक आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आहे. fadnavis-wife-comes-to-defense ही तीन दिवसांची पिकनिक नाही, आणि पिकनिकला माझ्याशिवाय जात नाही.  मुंबईचा महापौर नक्कीच मराठी माणूसच होणार आहे.” महापौरपदासाठी कोणत्या आरक्षण वर्गाच्या व्यक्तीला संधी मिळेल, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महापौरपदासाठी राजकीय चर्चा जोर धरली आहे.
Powered By Sangraha 9.0