बीएएमएस प्रवेशाचे खोटे स्वप्न; पालकाची पाच लाखांची फसवणूक

21 Jan 2026 19:37:31

तिरोड्यात बाप-लेकांविरोधात गुन्हा दाखल

गोंदिया,
वैद्यकीय शिक्षणासाठी बीएएमएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून Five lakh rupees fraud पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार तिरोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांदोरी खुर्द येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार २३ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडला. याप्रकरणी हरिचंद मोडकू वैद्य (५०), रा. चांदोरी खुर्द यांनी तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी फागुलाल शिवाजी भगत (५३) व आशिष फागुलाल भगत (२४), दोघे रा. बाघोली, सध्या पारसनगरी, तिरोडा या बाप-लेकांनी उत्तराखंड येथील मंजिरादेवी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, उत्तरकाशी येथे बीएएमएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. यानंतर आरोपींनी टप्प्याटप्प्याने फोन-पेच्या माध्यमातून तब्बल पाच लाख रुपये घेतले. मात्र, दीर्घ काळ लोटूनही मुलाचा प्रवेश न झाल्याने व पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
 

fraud dksl 
 
Five lakh rupees fraud  काही दिवसांनी प्रवेश झाल्याचे खोटे सांगून आरोपींनी पुन्हा विश्वास निर्माण केला. मात्र संशय आल्याने हरिचंद वैद्य यांनी थेट कॉलेजच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता मुलाचा कोणताही प्रवेश झालेला नसल्याचे समोर आले. यामुळे मुलाचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले असून, तरीही आरोपींनी पैसे परत देण्यास नकार दिला. या प्रकरणी तिरोडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक कवडे पुढील तपास करीत आहेत.
 
 
सहा वेळा ऑनलाईन व्यवहार
आरोपी आशिष भगत याच्या बँक खात्यात एकूण सहा वेळा पाच लाख रुपये जमा करण्यात आले. यात २३ ऑगस्ट २०२४ रोजी ५० हजारश् दुसर्‍यांदा ५० हजार, २९ ऑगस्ट २०२४ रोजी १ लाख, ३, ९, १८ सप्टेंबर २०२४ प्रत्येकी १ लाख असे ५ लाख रुपये फोन-पे द्वारे हस्तांतरीत करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0