भंडारा,
tigers spotted in bhandaras भंडारा जिल्ह्यातील पवनी–उमरेड–करंडला अभयारण्यात चार वाघांचे मनमोहक दृश्य पर्यटकांच्या नजरेस पडले असून ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जंगल सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना एकाच वेळी चार वाघांचे दर्शन झाले.
या दुर्मिळ क्षणाचे त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाघांचे मुक्त संचार करतानाचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली असून अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे.tigers spotted in bhandaras वन्यजीवप्रेमींसाठी हे दृश्य अत्यंत आकर्षक ठरत आहे.