नागपूर,
Shri Ganesh Temple Hill , टेकडी यांच्या वतीने गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त सायंकाळी ५:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीही गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले असून हा याग मंदिराचे वेदमूर्ती आचार्य यज्ञेश दीक्षित, पं. संकेत देशमुख, पं. विश्वनाथ शर्मा, ब्रह्मवृंद आन्हुश व्यास, शंभू टानपे, अजिंक्य कुळकर्णी, निलेश शर्मा व रघुनाथ शर्मा यांच्या पौरोहित्याखाली संपन्न होणार आहे.
गणेश यागाचे प्रमुख यजमान अभिषेक अग्रवाल सपत्नीक आहेत. दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वाजता श्री गणेश पूजन, नवग्रह पूजन व वास्तू पूजनानंतर गणेश यागाच्या हवनास सुरुवात होईल. दि. २२ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजता श्री गणेश यागाची पूर्णाहुती होणार आहे. Shri Ganesh Temple Hillयावेळी श्री गणेशाची फुलांची आकर्षक शेज सजविण्यात येणार असून मंदिरातर्फे तीळाच्या रेवडीचा प्रसाद वितरित करण्यात येईल.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिरातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी शोभायात्रा समितीची स्थापना करण्यात आली आहे. Shri Ganesh Temple Hill ही शोभायात्रा सायंकाळी ५:०० वाजता श्री गणेश मंदिरातून निघून मानस चौक, अन्सारी रोड, राजस्थानी महिला मंडळ, मॉरिस कॉलेज टी-पॉईंट, व्हरायटी चौक, सिताबर्डी मेन रोड, लोखंडी पूल मार्गे पुन्हा मानस चौकातून श्री गणेश मंदिर येथे रात्री ८:०० वाजता विसर्जित होईल.
शोभायात्रेत भव्य श्री गणेश रथ, आकर्षक झांकी, घोडा, बँड, ढोल-ताशा पथक, विद्युत रोषणाई तसेच मंगल कलश पथक सहभागी होणार आहे. या उपक्रमासाठी सिताबर्डी मेन रोडवरील व्यापारी वर्गाचे नेहमीप्रमाणे सहकार्य लाभत आहे. तसेच श्री गणेश मंदिरातर्फे रविवार, दि. २५ जानेवारी रोजी दुपारी १:०० ते ४:०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या कार्यकारिणी मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र