हाफिज सईदने खोदला नवीन लष्करी तळाचा पाया!

21 Jan 2026 11:01:43
मुलतान,
Hafiz lays foundation for military base पाकिस्तानच्या मुलतानमध्ये एका नवीन लष्करी तळाच्या बांधकामाच्या कार्यक्रमात हाफिज सईदच्या उपस्थितीने पुन्हा एकदा जागतिक खळबळ उडाली आहे. या तळाच्या बांधकामाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात हाफिज सईद दिसला असून, त्याने पाया खोदला आणि बांधकामाच्या प्रारंभिक कामात सहभागी होऊन प्रार्थना करताना फोटोमध्ये दिसला. हाफिज सईद हा कुख्यात दहशतवादी असून त्याने भारताविरोधी अनेक हल्ल्यांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. तो 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. तसेच पुलवामा हल्ल्याचा देखील तो मास्टरमाइंड मानला जातो. काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, दहशतवादी गटांना निधी पुरवणे आणि अनेक अन्य प्रकरणांमध्ये त्याचे नाव एनआयएने नोंदवले आहे.
 
Hafiz lays foundation for military base
 
हाफिज सईद भारतासह इतर अनेक देशांमध्ये दहशतवादी म्हणून घोषित आहे. तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे आणि जमात-उद-दावा संघटनेशी देखील त्याचे संबंध आहेत. त्याच्यावर अंदाजे 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले गेले आहे. अमेरिकेने 2012 पासून त्याच्यावर 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे आणि त्याला जागतिक “दहशतवाद्यांच्या गुन्हेगारांच्या” यादीत समाविष्ट केले आहे. हाफिज सईदच्या या उपस्थितीने पाकिस्तानमधील दहशतवादाच्या कारखान्याचा उघड प्रकटीकरण झाल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून आले आहे. पाकिस्तानच्या भूमीवर त्याच्या सक्रियतेमुळे भारतासह जगभरातील सुरक्षा यंत्रणांना गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0