दिग्रसला काडतुसांसह एकास अटक

21 Jan 2026 18:59:31
दिग्रस,
शहरात एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरातील Illegal weapons अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. सोमवार, 19 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिग्रस परिसरात गस्तीवर असताना, मोहंमद आसिम मोहंमद अफजल नावाचा व्यक्ती कंबरेला पिस्तुल लावून दिग्रस-आर्णी बायपासवरील हिंदू मोक्षधामभूमीजवळ उभा असल्याची माहिती मिळाली.
 
 
kartus
 
पोलिसांनी वेढा घालून संशयास्पद स्थितीत बसलेल्या एका इसमाची झडती घेतली असता, त्याच्याकडे Illegal weapons एक देशी बनावटी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. शस्त्राबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला दिग्रस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, हे शस्त्र त्याने कोठून आणले व त्याचा काय उद्देश होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक पवन राठोड, अंमलदार बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0