नागपूर,
polytechnic students गोविंदराव वांजारी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या (जीडब्ल्यूसीईटी) पॉलिटेक्निक विभागाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अलीकडेच शिवम फूड प्रॉडक्ट्स प्रा. लि., पारलेजी, बहादुरा, नागपूर येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
जगातील सर्वात मोठी बिस्किटे उत्पादक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्योगाला भेट देण्याची संधी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मिळाली. या भेटीदरम्यान अजय पेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विविध यंत्रसामग्री, उत्पादन प्रक्रिया व विविध विभागांची माहिती दिली तसेच कारखान्याची सविस्तर सफर घडवून आणली. विद्यार्थ्यांनी बिस्किटे निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून ज्ञान मिळवले. polytechnic students या औद्योगिक भेटीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण, पॉलिटेक्निक समन्वयक राज कुहिते तसेच प्रा. दिपाली गौतम, प्रा. समीक्षा कडू, प्रा. अमोल घोडे, प्रा. किमया देवईकर व प्रा. निखिल राऊत यांचे आभार मानले.
सौजन्य: मनोज वैराळकर, संपर्क मित्र