हिंगणघाट,
Justice for the corporator हिंगणघाट नगरपरिषदेच्या सर्वसाधारण निवडणुकीची सर्वसाधारण सभा २० जानेवारीला उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांच्या अध्यक्षते खाली झाली. या सभेत बांधकाम समितीच्या सदस्यपदासाठीच्या एका जागेसाठी अपक्ष नगरसेवक सूरज कुबडे यांच्या नावाची शिफारस राकाँ गटनेते विनोद झाडे यांनी केली. परंतु पिठासीन अधिकार्यांनी नगरसेवक राकाँच्या गटात नसल्यामुळे ही शिफारस फेटाळून लावली. त्यावेळी सभागृहात ज्येष्ठ नेते अॅड. सुधीर कोठारी हे उपस्थित नव्हते. त्यांना गटनेते विनोद झाडे यांनी मोबाईल वरून माहिती दिली. अॅड. कोठारी तात्काळ सभागृहात आले. दीड तास युतिवाद करून पिठासीन अधिकार्यांना निरूत्तर करीत सूरज कुबडे यांचे नाम निर्देश पत्र कायम ठेवण्यात संमती दिली.

Justice for the corporator नपच्या राजकारणातील मागील ३१ वर्षाचा असलेला अनुभवाचा फायदा पहिल्यांदाच सभागृहात पोहोचलेल्या लोकप्रतिनिधींसाठी हा एक अमूल्य ठेवाच आहे. अनुभव, कायद्याचा अभ्यास व वकृत्व शैलीचा मिलाफ सभागृहातील सर्वच नगरसेवकांना पाहायाल मिळाल. या सभेत निर्वाचित ४० पैकी ३९ नगरसेवकांना कोणत्या ना कोणत्या समितीवर काम करण्याची संधी मिळाली. परंतु, अपक्ष नगरसेवक असलेल्या सूरज कुबडे यांना संधी मिळत नव्हती. परंतु, अॅड. सुधीर कोठारी यांच्या मुळे एका सामान्य घरातील व पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या युवकांला एका समितीचा सदस्य होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल कुबडे यांनी अॅड कोठारी यांचे आभार व्यत केले.