लाडकी बहीण हफ्ता थांबला? ही सामान्य चूक तुम्ही केली असाल तर वाचा

21 Jan 2026 11:02:14
मुंबई,  
ladki-bahin-yojana-ekyc महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी फायदेशीर ठरत असतानाही काही लाभार्थी महिलांना अद्याप अपेक्षित अनुदानाचा हप्ता मिळालेला नाही. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रियाही पूर्ण केली असूनही त्यांना पैसे जमा झाले नाहीत, ज्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ladki-bahin-yojana-ekyc 
 
या प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि आरोग्य, पोषण सुधारण्यासाठी राबवली जात आहे. सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. ladki-bahin-yojana-ekyc परंतु काही लाभार्थींनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत. मंत्री तटकरे म्हणाल्या की, या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे. या उपाययोजनेतून महिलांना योग्य वेळेत हप्ता मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
तथापि, सध्या अनेक महिलांना ई-केवायसी केल्यानंतरही अनुदान मिळालेलं नाही. काही लाभार्थी महिला यासंबंधी अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवत असल्या तरी, कोणतीही दखल अथवा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी हजारो महिलांच्या अडचणी वाढल्या आहेत. ladki-bahin-yojana-ekyc हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर महिलांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. आपला हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, ई-केवायसी पूर्ण आहे की नाही, हे तपासण्यासाठी सकाळपासून शेकडो महिला कार्यालयासमोर उपस्थित होत्या. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काढलेल्या या मोर्चामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन आता या त्रुटी दूर करण्यास तत्पर आहे, जेणेकरून सर्व पात्र महिलांना योग्य वेळेत हप्ता मिळू शकेल.
Powered By Sangraha 9.0