गृहिणी समाजाचा मकरसंक्रमण उत्सव जल्लोषात

21 Jan 2026 19:35:10
नागपूर,
housewives community गृहिणी समाज, हनुमान नगर संस्थेच्या वतीने ‘मकरसंक्रमण उत्सव’ व ‘भारत माता पूजन’ असा दुहेरी कार्यक्रम संस्थेच्या स्व. मीरादेवी दस्तुरे सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध डॉक्टर व समाजसेविका डॉ. राधा मुंजे उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी श्रद्धा झरकर यांनी भारतमाता गीत सादर केले.
 
housewives community
 
डॉ. राधा मुंजे यांनी गृहिणींच्या आरोग्यविषयक समस्या तसेच आर्थिक नियोजन या विषयांवर उपस्थित महिलांशी संवाद साधला. तसेच सायबर गुन्ह्यांपासून कसे सावध राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शारदा खळतकर यांनी १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या हिंदू संमेलनाबाबत महिलांना माहिती दिली. housewives community कार्यक्रमात प्रभाग क्रमांक ३१ मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका मंगला मस्के व मानसी सिमले यांची उपस्थिती होती.
 
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात हळदीकुंकू व वाण कार्यक्रम संपन्न झाला. housewives community उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गृहिणी समाज संस्थेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: माधुरी पाडळकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0