शेवटचा निरोप: शहीद मुलासाठी आई-वडिलांनी केली ४ किमीची पायपीट, VIDEO

21 Jan 2026 11:30:42
कपकोट,  
martyred-gajendra-singh जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ‘ऑपरेशन त्राशी-I’ दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या हवालदार गजेंद्र सिंह गढियाला मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. मात्र, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थितांच्या डोळ्यांवर पाणी आलं कारण शहीदाच्या वृद्ध आई-वडीलांना आपला वीर पुत्र शेवटचे पाहण्यासाठी ४ किलोमीटर डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागली. गावापर्यंत पक्का रस्ता नसल्यामुळे अखेर कपकोट पदवी महाविद्यालयाच्या मैदानावर पार्थिव आणण्यात आले आणि तेथून १३ किलोमीटर गाडीने प्रवास करून कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात आले.
 
martyred-gajendra-singh
 
उत्तराखंडमधील कपकोट येथील बीथी पन्याती गावाचे रहिवासी ४३ वर्षीय गजेंद्र हे ‘टू-पैरा’ कमांडो युनिटमध्ये तैनात होते. गजेंद्र हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. martyred-gajendra-singh त्यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक आणि मानसिक आधार मोडला आहे. वृद्ध आई-वडील शेती करून उदरनिर्वाह करत आहेत, तर धाकटा भाऊ कमी पगारावर शिक्षक म्हणून काम करतो. पत्नी लीला गढिया आणि दोन चिमुरडे मुलं डेहराडूनमध्ये भाड्याच्या खोलीत राहत आहेत. पतीचे पार्थिव मिळाल्यापासून पत्नी बेशुद्ध पडत होत्या, तर मुलांच्या रडण्याने उपस्थितांची हृदयवेदना वाढवली.
सौजन्य : सोशल मीडिया 
शहीद गजेंद्र यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा डोंगरदऱ्यातील रस्त्यांच्या अभावामुळे गावकऱ्यांची व्यथा समोर आली. माजी सरपंचांनी सांगितले की, रस्ता नसल्यामुळे आजही गरोदर स्त्रिया आणि रुग्णांना डोलीत घालून नेणे भाग पडते. हवालदार गजेंद्र सिंह गढियाचा अंत्यसंस्कार सरयू आणि खीरगंगा नद्यांच्या संगमावर लष्करी इतमामात करण्यात आला. martyred-gajendra-singh यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘शहीद गजेंद्र सिंह अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घटनेमुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानाच्या आई-वडिलांच्या संघर्षाची वेदनादायक कहाणी पुन्हा उजेडात आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0