मुंबई,
rcb-and-rajasthan-royals-home-matches आयपीएल 2026 संदर्भात चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांना मंगळवार, 20 जानेवारी रोजी महत्त्वाची मुदत दिली आहे. या दोन्ही संघांनी आपले सामने जयपूर आणि बंगळुरू येथे आयोजित करायचे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय 27 जानेवारीपर्यंत कळवण्याचे निर्देश बीसीसीआयने दिले आहेत.

या दोन संघांच्या होम ग्राउंडवर सध्या संभ्रमाची स्थिती आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमला यजमानपद मिळण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे, कारण राजस्थान क्रिकेट संघटनेच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तर दुसरीकडे, बंगळुरूमध्ये आयपीएल 2025 च्या विजयोत्सवानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आरसीबी आपल्या होम मॅचेस तिथे घेण्यास साशंक आहे. कर्नाटक सरकारने जरी स्टेडियमला सशर्त परवानगी दिली असली, तरी त्या अटी आरसीबीसाठी चिंतेच्या ठरत आहेत. वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स आपले होम सामने पुण्यात खेळण्याचा विचार करत आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पाच आणि रायपूरमध्ये दोन होम सामने आयोजित करू शकते. मात्र, नवी मुंबईत सामने घेण्यासाठी आरसीबीला मुंबई इंडियन्सकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) घ्यावे लागणार आहे, कारण आयपीएलच्या नियमांनुसार एका शहरात दोन संघांचे सामने होऊ शकत नाहीत. rcb-and-rajasthan-royals-home-matches तसेच तमिळनाडू, आसाम आणि बंगाल या राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच आयपीएल 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कर्नाटक सरकारने लागू केलेल्या नव्या कायद्यामुळे आरसीबीची चिंता वाढली आहे. जरी आरसीबी बाहेरून बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्येच सामने खेळवण्याची इच्छा दर्शवत असली, तरी प्रत्यक्षात ती परिस्थिती वेगळी आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी घडलेल्या घटनेनंतर (ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता) कर्नाटक सरकारने असा कायदा केला आहे की, स्टेडियममध्ये सामना किंवा कार्यक्रम सुरू असताना बाहेरील रस्त्यावर काहीही अनुचित घडले, तरी त्याची जबाबदारी आयोजकांवर राहील. rcb-and-rajasthan-royals-home-matches हाच कायदा आरसीबीच्या मालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून, त्यामुळेच बंगळुरूतील सामने घेण्याबाबत ते सावध पवित्रा घेत आहेत.
आयपीएल २०२६ २६ मार्च रोजी सुरू होणार आहे आणि अंतिम सामना ३१ मे रोजी होणार आहे. आयपीएल सामन्यांची ठिकाणे चेन्नई, दिल्ली, लखनौ, मुंबई (वानखेडे), कोलकाता, अहमदाबाद, न्यू चंदीगड, हैदराबाद, धर्मशाळा, विशाखापट्टणम, गुवाहाटी, जयपूर, बेंगळुरू, पुणे, रायपूर, रांची, नवी मुंबई (डीवाय पाटील) आणि तिरुवनंतपुरम आहेत.