गायक अजित कडकडे यांची येवले यांचे निवासस्थानी भेट

21 Jan 2026 17:59:27
मंगरूळनाथ, 
भक्तीगीत, भावगीत व गझल Singer Ajit Kadkade गायक अजित कडकडे यांनी मंगरूळनाथ येथे येथील विधीज्ञ मनोज येवले यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमास भेट दिली. यावेळी येवले कुटुंबियांनी त्यांचा शाल, श्रीफळ, देऊन सत्कार केला. यावेळी वर्धा येळखेडी आश्रमाचे संत सयाजी महाराज उपस्थित होते.
 
 
Ajit dks
 
सर्व प्रथम Singer Ajit Kadkade अजित कडकडे यांनी व संत सयाजी महाराज यांनी शहरातील आराध्य दैवत संत बिरबलनाथ महाराज मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शहरातील जुने सोनखास येथील मनोज येवले यांचे वडील स्व. वसंतराव येवले यांच्या स्मृती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या निवासस्थानी भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कडकडे यांनी ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ या त्यांच्या भक्ती गीतावर स्वर बांधला विविध भक्ती गीते, दत्त गुरू तसेच संत सयाजी महाराज यांच्या बद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संत सयाजी महाराज यांनी मानव कल्याण, संत संगती व आहार विहार यावर प्रवचन केले. कार्यक्रमस शहरातील तसेच जुने सोनखास येथील भाविक भक्त उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0