मानोरा,
Sports competition जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी खेळ व क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत १९ जानेवारी रोजी झालेल्या झाकी स्पर्धेत पंचायत समिती, मानोरा यांनी नगारा म्युझियम (बंजारा विरासत) या संकल्पनेवर आधारित झाकी सादर करून द्वितीय क्रमांक पटकावला.
Sports competition या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंचायत समिती मानोरा येथील कर्मचार्यांचा मुख्यकार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या झाकी कार्यक्रमात गट शिक्षण अधिकारी अनिल पवार, शिक्षक प्रवीण म्हातारमारे, राहुल इंगोले, रणजित जाधव, मोतीराज जाधव, पृथ्वीराज आडे, गणेश जाधव, संगीता जाधव, मंगला गोदमले, प्रतिभा सौंदळे, प्रतिभा इंगोले, नितीन पाटील, संगीता मुळे, मनुषा अंनतवार, यांचे सह ३५ शिक्षक शिक्षिका यांनी झाकीत सहभाग नोंदविला या यशाबद्दल सर्व स्तरातून टीम मानोरा यांचे अभिनंदन होत आहे.