धक्कादायक...बायकोचे १०० पुरुषांसोबत संबंध, नवरा करायचा व्हिडीओ शूट आणि...

21 Jan 2026 12:04:32
करीमनगर,  
telangana-sex-racket तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आर्थिक कर्जातून बाहेर पडण्यासाठी एका सोशल मिडिया 'क्वीन' आणि तिच्या नवऱ्याने ‘हनीट्रॅप’ आणि ब्लॅकमेलिंगचा धोकादायक खेळ रचला होता. त्यांनी मिळून १५०० पेक्षा अधिक पुरुषांना या जाळ्यात अडकवले आणि त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली केली. पोलिसांपर्यंत पोहोचलेली तक्रारनंतर या नवरा-बायकोचा खरा चेहरा समोर आला आणि त्यांना अटक करण्यात आली.

telangana-sex-racket 
 
तपासात पोलिसांनी सांगितले की, महिला सोशल मीडियावर आकर्षक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून पुरुषांना लक्ष्य करत होती. पुरुषांना जाळ्यात अडकवून घरात बोलावले जात असे, जिथे महिला त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवत असे. तर तिचा नवरा गुपचूप हे क्षण व्हिडीओमध्ये शूट करत असे आणि नंतर या व्हिडिओच्या माध्यमातून पुरुषांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत असे. तपासात समोर आले की, या जोडप्याचे मार्बल व्यवसायात मोठे नुकसान झाले होते आणि फ्लॅटसाठी ईएमआय सुरु होती. सतत वाढत गेलेले आर्थिक ओझे या प्रकारामागील मुख्य कारण होते. telangana-sex-racket गेल्या तीन वर्षांत त्यांनी १०० हून अधिक व्यक्तींना थेट फसवले, तर १५०० पेक्षा अधिक लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवले. फसवणुकीत त्यांनी एका बिझनेसमनकडून एकूण १८ लाख रुपये वसूल केले. पोलिस आता तपास करत आहेत की, या सेक्स रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे की नाही. आरोपी नवरा-बायकोला अटक करण्यात आली असून, हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0