ऑस्ट्रेलियात गोळीबारात तीन ठार

    दिनांक :22-Jan-2026
Total Views |

Shooting in Australia
 
न्यू साउथ वेल्स,
Shooting in Australia न्यू साउथ वेल्समधील लेक कार्जेलिगो शहरात घडलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले आणि एक जखमी झाला आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे १५०० इतकी असून, घटनेनंतर तातडीने आपत्कालीन सेवा तिथे दाखल झाल्या. मृतांमध्ये दोन महिला आणि एक पुरूष आहेत, तर गंभीर जखमी पुरुषाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, गोळीबार करणारा एकटाच होता, परंतु त्याच्यासोबत आणखी कोणी होते का याचा तपास सुरू आहे. हल्लेखोर फरार असल्याचा किंवा आणखी कोणी सहभागी होता यावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी लोकांना परिसर टाळण्याचे आणि रहिवाशांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.