मुंबई,
Bigg Boss Marathi Season 6 बिग बॉस मराठी सिझन ६ ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या सिझनमध्ये प्रवेश करताच अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर आपले ठसा उमटवले आहेत. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडली होती, पण त्याचबरोबर राधा आणि सागर यांची मजेशीर जुगलबंदी प्रेक्षकांना नक्कीच हसवायला भाग पाडत आहे.
या दोघांनी घरातील सदस्यांसमोर ‘सासू आणि सून’ यांचे रूप धारण करून घरात रंगत आणली आहे. राधा सासूच्या भूमिकेत असताना आपल्या सुनेच्या (सागरच्या) आणि इतर ‘मॉडर्न सुनांच्या’ वर्तनावर तक्रारी करताना दिसली. मालवणी ठसठशीत संवाद आणि विनोदी अंदाजाने राधाने हि भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली.राधा सासूच्या भूमिकेत म्हणाली, “ह्या पोरी जरा कामाला मदत करत नाहीत, मी सगळं घर किती सांभाळू?” तर सागर सुनेच्या भूमिकेत “संपलं असेल तर जेवायला वाढा चला!” असा मजेशीर प्रतिसाद देताना दिसला. यानंतर राधाने पुढे म्हटले, “या नवीन मॉर्डन सुना आल्या आहेत, यांना काही वळण नसल्यासारखं... अहो, आमचं तर नाचकामच बंद पडल्यासारखं झालाय!”
या संभाषणावर घरातील इतर सदस्यही पोट धरून हसताना दिसले. राधा आणि सागरची हसरी केमिस्ट्री आणि राधाच्या हास्याने भरलेल्या संवादामुळे घरातील तणावाच्या वातावरणात थोडा वेळ आनंदाचे वातावरण पसरले.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या मजेशीर जुगलबंदीवर भरभरून कमेंट्स करून हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनुसार, राधा-सागरची ही वेगळी शैली हा सिझन आणखी मनोरंजक बनवणार आहे.