नाहीतर पुढच्या निवडणुकीत उभं राहणं कठीण!

    दिनांक :23-Jan-2026
Total Views |
मुंबई,
difficult to stand in the election खासदार असदुद्दीन ओवेसींच्या अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या महापालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेषतः मुंब्र्यामधील एमआयएमच्या तरुण नगरसेविका सहर शेखच्या व्हायरल भाषणामुळे चर्चांना उधाण आले आहे. सहर शेख यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हसत हसत केली आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ‘कैसा हरया…’ असे विधान केले. पुढे त्यांनी म्हटले की, आता एवढ्यावरच न थांबवता येणाऱ्या काळात आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल तेव्हा संपूर्ण मुंब्रा शहर हिरव्या रंगात रंगवायचं आहे.” या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
 
 

sahar sheikh  
यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपण यांनी पत्रकारांशी बोलत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “मुंब्र्यामध्ये एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले. त्यानंतर अशी धमकी देणे म्हणजे आव्हान आहे. भारतात जवळपास हजार वर्ष मुस्लिम शासकांचा राज होता, पण ते भारताला हिरवा करू शकले नाहीत. भारताची हिंदू ओळख कायम आहे. तुम्ही मुंब्र्यातील थोडक्यात लोक आहात; अशा आव्हानांना जागा देऊ नका. नाहीतर पुढच्या निवडणुकीत तुम्हाला उभं राहणं कठीण होईल. वाद निर्माण झाल्यानंतर सहर शेखने स्पष्टीकरण दिले की, माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्याने मी मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू असे म्हटले. जर झेंडा भगवा असता, तर मी भगव्या रंगात रंगवायचेच.या माध्यमातून सहरने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुंब्र्यातील या घटनांमुळे एमआयएम आणि शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव पुन्हा वाढल्याचे दिसत आहे, तर नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चर्चा जोरात सुरू आहे.