अंगावर काटा! 'रणपति शिवराय स्वारी आग्रा’चा ट्रेलर

    दिनांक :23-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Ranpati Shivray Swari Agra movie, छत्रपती शिवराय हे फक्त धैर्य आणि नेतृत्वामुळेच नव्हे, तर त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि दूरदृष्टीमुळे इतिहासात सदैव स्मरणीय आहेत. औरंगजेबासारख्या दगाबाज आणि कठीण शत्रूचा सामना करत छत्रपतींनी केलेली आग्रा भेट ही त्यांची धाडस आणि कणखर नेतृत्व याची ज्वलंत उदाहरण ठरली. या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.
 

Ranpati Shivray Swari Agra movie, 
ट्रेलरमध्ये छत्रपतींच्या या धाडसी स्वारीची थरारक झलक दिसून येते. औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यात आणि निराशेच्या वातावरणात महाराजांनी आपल्या बुद्धीने, राजकीय जाणिवेने आणि माणसांची उत्कृष्ट पारख दाखवत स्वारी कशी यशस्वी केली हे ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसते. प्रेक्षकांनी या ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून काहींनी “अंगावर काटा येतो” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर काहींनी अभिजीत श्वेतचंद्रची भूमिका कौतुकास्पद असली तरी चिन्मय मांडलेकरच्या जागा कोणीही घेऊ शकत नाही असे मत मांडले आहे.पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचे लिखाण आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून, ३० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, “शिवकाळातील तेजस्वी पान उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला असून, हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांची मेहनत आणि तयारी स्पष्ट दिसेल. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आकर्षित करेल.”
 
 
चित्रपटात मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक यांसारखे अनेक कलाकार दिसणार आहेत.चित्रपटाच्या मार्केटिंगमध्येही मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवीन प्रयोग दिसत आहेत. या निमित्ताने छत्रपतींच्या ‘तिसऱ्या डोळ्याची’ ख्याती असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेचा AI आधारित चॅटबॉट ट्रेलर प्रदर्शित प्रसंगी अनावरण करण्यात आला. हा चॅटबॉट युजरच्या प्रश्नांची विविध भाषांमध्ये काही सेकंदात उत्तरे देतो, ज्यामुळे इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी रसिकांसाठी हा अनुभव आणखी आकर्षक बनतो.