‘सालबर्डी’ एक थरारपट

23 Jan 2026 14:39:40
मुंबई,
salbardi movie इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा शोध अनेकदा निष्फळ ठरतो, पण काही वेळा त्या शोधामुळे अजून वेगळी, अनोखी रहस्ये जन्म घेतात. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा शोध घेणारा थरारपट ‘सालबर्डी’ नुकताच जाहीर झाला आहे. आगामी एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शित पोस्टरनेच या चित्रपटातील गूढ आणि भीषण विषय अधोरेखित केला आहे.
 

salbardi movie  
नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘सालबर्डी’ चित्रपटाचे निर्माता अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केले आहे. पोस्टरवरूनच या चित्रपटात गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास, त्यामागील सत्य आणि भीती, भ्रम यांचा अद्वितीय अनुभव प्रेक्षकांना मिळणार असल्याचे स्पष्ट होते.
 
 
‘सालबर्डी’मध्ये भय, थरार आणि विश्वास-अविश्वासाच्या कथेची छटा दिसून येते. या कथेत कोणत्या घटनेचा शोध काढला जाईल आणि सत्य बाहेर कसे येईल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत थरारक ठरणार आहे. चित्रपटात मराठीतल्या उत्तम कलाकारांचा सहभाग असून, तरीही कलाकारांची संपूर्ण माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आलेली आहे.छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांनी केले असून, पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांनी लिहिले आहेत. गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांच्यावर असून, अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांनी स्वरसाजाने चित्रपटाला रंगत आणली आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता दिपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे आणि रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांनी सांभाळली आहेत. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांनी केले आहे.सालबर्डीच्या रहस्याचा शोध घेणारा हा चित्रपट थरार आणि गूढतेची अद्वितीय संगम आहे. एप्रिलमध्ये प्रेक्षकांना या रहस्यमय गावाच्या कथा अनुभवता येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0