नागपूर,
Saraswati Pujan विश्वकुंभ आयुर्वेदिय चिकित्सालयात ज्ञान, विद्या आणि कला यांची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची पूजन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सरस्वती देवीच्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात आयुर्वेदातील ज्ञानपरंपरा, शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी विद्या व सद्गुण आत्मसात करावेत यावर मार्गदर्शन देण्यात आले. विश्वकुंभ आयुर्वेदिय चिकित्सालयाचे संचालक डॉ. संतोष सुर्यकांत पुसदकर यांनी सरस्वती देवींच्या विचारांचे महत्त्व सांगितले आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. Saraswati Pujan यावेळी चिकित्सालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वितरणाने करण्यात आला.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र