बदलापुर,
Sexual abuse of four-year-old girl in Badlapur बदलापुरमध्ये एका चार वर्षांच्या नर्सरीत शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे घडले. आरोपी इमरान पटेल याला बदलापुर पोलिसांनी आज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या सुनावणीनंतर आरोपीला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यासोबतच, गुन्ह्यात वापरलेली आरोपीची स्कूल व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे.
तपासात आरोपीकडे अधिकृत आरटीओ परवाना नसल्याचे उघड झाले. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरटीओ विभागाने आरोपीवर २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.घटनेची गंभीर दखल घेत बालहक्क आयोगाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देणे आणि शालेय वाहतुकीतील सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता तपासणे या उद्देशाने आयोगाकडून पावले उचलली जात आहेत.
काय झाले?
प्राथमिक माहिती Sexual abuse of four-year-old girl in Badlapur नुसार, बदलापुर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. काल दुपारी १२.३० वाजता ती शाळेच्या व्हॅनमधून घरी परतली नाही. मुलीच्या आईने चालकाशी फोनवरून संपर्क साधला, पण दीड तासानंतरच चिमुकली घरी परतली. ती खूप घाबरलेली होती. विचारपूस केल्यानंतर तिने सांगितले की स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या गुप्तांगाला हात लावला होता. पालकांनी त्वरित पोलिसांत तक्रार नोंदवली आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.चार वर्षांची चिमुकली नर्सरीत शिकत असल्याने पालकांनी तिला घेऊन शाळेत मुख्याध्यापिकेकडे परिस्थिती मांडली. मात्र, मुख्याध्यापिकेने चालकाच्या बाजूने उभे राहिले आणि कोणतीही कारवाई केली नाही. पालकांनी नंतर पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणातून राज्य सरकारच्या निर्देशांनुसार शाळांमध्ये बसमध्ये महिला अटेंडंटची अनुपस्थिती स्पष्ट झाली आहे.सध्या या घटनेनंतर नागरिक आणि बालहक्क संघटना शाळा प्रशासनावर आणि व्हॅन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. शालेय वाहतुकीत सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये त्वरित सुधारणा करण्याची गरज असल्याचे समाजात मत व्यक्त केले जात आहे.