सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची मोठी घोषणा 'आठवणी राहणार ताज्या'

    दिनांक :23-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Sushant Singh Rajput ‘छिछोरे’सह अनेक बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवणाऱ्या सुशांत सिंग राजपूत यांचे निधन आजही चाहत्यांच्या आठवणीत ताजे आहे. १४ जून २०२० रोजी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी झालेल्या धक्कादायक निधनाला सहा वर्षे उलटली असली, तरीही त्याचा चाहत्यांवर होणारा प्रभाव अजूनही जिवंत आहे.
 
 

Sushant Singh Rajput 
मेमोरियल क्लब अँड फिल्म डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट
२१ जानेवारी रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त एक Sushant Singh Rajput महत्वाची घोषणा करण्यात आली. सुशांत सिंग राजपूत मेमोरियल क्लब अँड फिल्म डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या नावाने एक संस्था स्थापन केली जाणार असल्याचे समोर आले आहे. ही संस्था सुशांतच्या सर्जनशील दृष्टिकोन आणि स्वप्नांनी प्रेरित असून कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रात रस असलेल्या तरुणांना प्रशिक्षण देण्याचा उद्देश ठेऊन सुरू केली जाणार आहे.संस्थेचे स्थापक सदस्य म्हणजे कृष्ण कुमार सिंग (वडील), प्रमोद कुमार सिंग, प्रा. बी.एन. सिंग, अरुण सिंग, डॉ. सुनील चंद चुनी, शैलेंद्र कुमार सिंग, चंद्र शेखर सिंग आणि राजेश्वरी सिंग यांचा समावेश आहे. संस्थेच्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांना अभिनय, दिग्दर्शन, लेखन तसेच तांत्रिक शिक्षणात करिअर करण्याच्या संधी दिल्या जातील. हे प्रशिक्षण कार्यशाळा पाटणा येथील कंकरबाग हाऊसिंग कॉलनीमध्ये आयोजित केली जाणार आहेत.
 
 
 
चाहत्यांमध्ये उत्साह
सुशांतच्या चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागत Sushant Singh Rajput केले आहे. संस्थेद्वारे कलाकारांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासोबतच नवोदित कलाकारांना मार्गदर्शन मिळणार असल्याने हे उपक्रम देशभरातील चित्रपटप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करीत आहेत.अभिनेत्याच्या जीवनातील या नव्या अध्यायाबद्दल त्यांचे वडील म्हणाले, “ही संस्था आमच्या मुलाच्या स्वप्नांचा आदर म्हणून सुरू केली जात आहे. आम्ही आशा करतो की यामुळे अनेक तरुणांना त्यांच्या सर्जनशील कारकिर्दीत मदत होईल.”स्मरण राहो की, सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील न्यायिक तपास अद्याप पूर्ण झालेले नाही. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला संबंधित प्रकरणात काही काळ तुरुंगवास भोगावा लागला होता, पण नंतर तिला निर्दोष मुक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, सुशांतच्या आठवणींना समर्पित ही नवीन संस्था अधिक महत्त्वाची Sushant Singh Rajput ठरली आहे.