अरे देवा...घरात शिरलेल्या बिबट्याला तरुणाने केले ठार

24 Jan 2026 14:28:46
कटक,
A young man killed a leopard ओडिशातील कटक जिल्ह्यातील नरसिंहपूर परिसरात एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अनंत प्रसाद गावात एका तरुणाच्या घरात अचानक बिबट्या शिरला आणि थेट झोपेत असलेल्या तरुणावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घरात गोंधळ उडाला. मात्र, जीव वाचवण्यासाठी तरुणाने प्रचंड धैर्य दाखवत बिबट्याला प्रतिकार केला. काही वेळ दोघांमध्ये झटापट सुरू राहिली. या संघर्षात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी झाला.
 
 
leopard
 
जखमी तरुणाचे नाव समर भोळ असे असून त्याच्या शरीरावर अनेक खोल जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या समरला तातडीने नरसिंहपूरच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेदरम्यान गावातही मोठी घबराट पसरली. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बिबट्या गावात फिरत असताना अनेक वाहनांचे नुकसान झाले.
Powered By Sangraha 9.0