कुरखेडा,
Maharana Ganesh Utsav Mandal शहरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे निमित्त साधत महाराणा गणेश उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची छाप पाडणार्या व्यक्तीमत्वांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार क्रिष्णा गजबे यांचा हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख तथा पाणीपुरवठा सभापती आशीष काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडणे, शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख अनिकेत आकरे, लालचंद धाबेकर, डॉ. जगदिश बोरकर, डॉ. मयुर नाकाडे, नगरसेवक अतूल झोडे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष उल्हास देशमुख, इंजि. तुषार कूथे, लक्ष्मन धुळसे, सुशिल बेहार, आसिफ शेख, नगरसेवक अशोक कंगाले, वनक्षेत्र साहायक संजय कंकलवार, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष रूपाली कावळे, कल्पना मांडवे, चित्रा गजभिये आदी उपस्थित होते.
यावेळी विधी तसेच सामाजिक Maharana Ganesh Utsav Mandal व राजकीय क्षेत्रात कार्यरत नगरसेवक अॅड. उमेश वालदे, पत्रकारीतेच्या क्षेत्रात कार्यरत सिराज पठान, युवा होतकरू कंत्राटदार इंजि. शुभम गोटेफोडे, युवा मराठी उद्योजक रेशम तोंडरे, लोकेश लांजेवार तसेच शासकीय आदिवासी वस्तीगृहाचे उपक्रमशील गृहपाल सदाशिव नरताम यांचा मंडळाच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सागर निरंकारी, मंगेश मांडवे, जगदिश कूमरे, धिरज गणविर, रोशन कूंभलवार, निलेश चंदनखेडे, राज नागापूरे, कुंदन देशमुख, विशाल शिंदिमेश्राम, सोमेश्वर पेंदाम, श्याम विखे, संकल्प राऊत, विकी अरगेलवार, हरिश पिल्लेवान, सुमित माकडे, अस्सू शेख, रूपेश राऊत, कुणाल लांजेवार, प्रमोद कोटांगले, उद्धव आठवले, नामदेव कवडो, गोलू घरडे, स्वप्नील खोब्रागडे यांनी सहकार्य केले.