अभिनेते भारत गणेशपुरे पारवा ग्रामस्थांची संवाद साधणार

25 Jan 2026 18:55:15
मंगरूळनाथ,
Actor Bharat Ganeshpure, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाकरिता सुप्रसिद्ध अभिनेते व हास्य सम्राट भारत गणेशपुरे २७ रोजी मंगरूळनाथ तालुक्यातील पारवा या गावी येणार असून या कार्यक्रमाला समस्त गावकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन येथील सरपंच गोपाल लुंगे व उपसरपंच व सदस्य यांनी केले आहे.
 

Actor Bharat Ganeshpure, 
या कार्यक्रमात मुख्यमंत्री Actor Bharat Ganeshpure, समृद्ध पंचायतराज अभियान विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण व गटविकास अधिकारी पूनम राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तसेच या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी व गावाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी गावाकर्‍यांशी खास वर्‍हाडी शैलीत गावकर्‍याशी व येणार्‍या नागरिकाशी सुसंवाद साधण्यासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेते हास्यसम्राट भारत गणेशपुरे येत आहे. या कार्यक्रमाला समस्त जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0