Border 2 ने दुसऱ्याच दिवशी केला 'धमाका'

25 Jan 2026 11:44:08
मुंबई,
Border 2 box office collection १९९७ साली प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचा वारसा पुढे नेणारा ‘बॉर्डर २’ सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे या सिक्वेलबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, बहुतेक प्रेक्षकांचे मत आहे की हा चित्रपट मूळ ‘बॉर्डर’ला न्याय देणारा ठरतो आहे. सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली आहे.
 

Border 2 box office collection 
जोरदार अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या Border 2 box office collection  आधारावर ‘बॉर्डर २’ ने शुक्रवारी ₹३० कोटींची भक्कम ओपनिंग केली. मात्र उत्तर भारतातील मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी प्रिंट पोहोचण्यात झालेल्या विलंबाचा परिणाम कमाईवर झाला असून, काही लाख रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. तरीही, गेल्या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या पंधरा चित्रपटांमध्ये ‘बॉर्डर २’चे स्थान भक्कम मानले जात आहे.अनुराग सिंग दिग्दर्शित आणि सुमारे ₹२७५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी आणखी वेग पकडला. सॅकनिल्कच्या प्राथमिक अंदाजानुसार, शनिवारी चित्रपटाने सुमारे ₹३५ कोटींची कमाई केली असून, दोन दिवसांतील एकूण देशांतर्गत कलेक्शन ₹६५ कोटींवर पोहोचले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या शोमध्ये १५.५१ टक्के, दुपारच्या शोमध्ये ३९.९७ टक्के, संध्याकाळच्या शोमध्ये ४९.१३ टक्के आणि रात्रीच्या शोमध्ये ६१.७० टक्के प्रेक्षक उपस्थिती नोंदवली गेली, यावरून वीकेंडमध्ये कमाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
देशांतर्गतच नव्हे तर परदेशातही Border 2 box office collection  ‘बॉर्डर २’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी परदेशात चित्रपटाने ₹७.५० कोटींची कमाई केली असून, यामुळे पहिल्याच दिवशी जगभरातील एकूण कलेक्शन ₹४३.५० कोटींवर गेले होते. भारतीय आणि परदेशातील मिळून झालेल्या कमाईमुळे चित्रपटाची सुरुवात आशादायक ठरली आहे.२०२५-२०२६ या कालावधीतील टॉप टेन ओपनिंग चित्रपटांमध्ये ‘बॉर्डर २’ने दुसरे स्थान मिळवले असून, ‘छावा’ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, प्रजासत्ताक दिनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘बॉर्डर २’ने ₹३० कोटींसह दुसरे स्थान पटकावले आहे. यापूर्वी ‘पठाण’ने ₹५५ कोटींची कमाई करून पहिला क्रमांक मिळवला होता.
दुसऱ्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘बॉर्डर २’ने ‘दंगल’, ‘पद्मावत’, ‘धूम ३’ आणि ‘स्त्री २’ यांसारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मागे टाकले असले, तरी ‘पठाण’, ‘अ‍ॅनिमल’, ‘टायगर ३’, ‘पुष्पा २’, ‘केजीएफ २’ आणि ‘जवान’ यांसारख्या मेगा हिट्सच्या तुलनेत तो अजून मागे आहे. दरम्यान, ‘बॉर्डर २’च्या प्रदर्शनाचा परिणाम इतर चित्रपटांवरही दिसून येत असून, ‘धुरंधर’ने जवळपास ५० दिवसांनंतर प्रथमच एका दिवसात ₹१ कोटींपेक्षा कमी कमाई नोंदवली आहे. शनिवारी या चित्रपटाने केवळ ₹५५ लाखांची कमाई केली.आता रविवार आणि स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे ‘बॉर्डर २’साठी खरी कसोटी सुरू होणार असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचतो का आणि ‘धुरंधर’चा दीर्घकालीन रेकॉर्ड मोडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0