पिंपरी
Pimpri mayor election पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून शनिवार, २४ जानेवारी रोजी अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महापौर व उपमहापौर Pimpri mayor election पदासाठी इच्छुक नगरसेवकांनी सोमवार, २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार असून, ते पूर्ण भरून त्याच दिवशी सादर करणे बंधनकारक असणार आहे.या निवडणूक प्रक्रियेत महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच स्थायी समिती व विविध विषय समित्यांवरील सदस्यांची नियुक्तीही याच निवडणूक प्रक्रियेचा भाग असणार आहे. समित्यांमध्ये महिलांचे किमान ५० टक्के प्रतिनिधित्व राहील, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या या Pimpri mayor election विशेष सभेसाठी सहकार आयुक्त दीपक तावरे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर पदाची निवड महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ तसेच महापौर व उपमहापौर निवड नियम २००६ आणि त्यानंतर झालेल्या सुधारित नियमांनुसार पार पडणार आहे.या निवडणुकीमुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी आणि अंतर्गत बैठका सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ६ फेब्रुवारीच्या विशेष सभेकडे शहराचे लक्ष लागले आहे.