अंतिम निर्णय होणार महापौरपदाचा 'पेढा' कोणाचा तोंडी?

    दिनांक :25-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Mayoral Posts in Maharashtra राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौरपदासाठी राजकीय रस्सीखेच तीव्र झाली आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरही सत्तावाटपाचे समीकरण अजून निश्चित झालेले नाही. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील आजची महत्वाची बैठक राज्यभराच्या राजकीय वर्तुळाकडे लक्ष वेधून घेत आहे. या बैठकीत महापौरपदासह उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती आणि इतर प्रमुख पदांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
 

Mayoral Posts in Maharashtra 
या निवडणुकीत भारतीय Mayoral Posts in Maharashtra जनता पक्ष (भाजपा) सर्वात मोठ्या पक्षाच्या रूपात पुढे आला आहे, तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालेले नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकांवर युतीचाच महापौर निवडला जाईल, असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला आहे.मुंबई महापालिकेतील ८९ जागांवर भाजपला विजय मिळाला असला तरी बहुमत स्थापन करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा आवश्यक आहे. शिंदे गटाने सत्तेत मोठा वाटा मिळावा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर, स्थायी समिती, सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदांसाठीही शिवसेनेने आपला आग्रह धरल्याची माहिती आहे.
 
 
 
ठाणे, कल्याण-डोंबिवली Mayoral Posts in Maharashtra आणि मीरा-भाईंदर महापालिकांमध्येही सत्तावाटपावरील चर्चा सुरू आहेत. विशेषतः कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे समीकरणांमध्ये बदल झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरही हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत सर्व महापालिकांबाबत एकत्रित निर्णय होण्याची शक्यता आहे.राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक निर्णायक ठरण्याची अपेक्षा आहे. महापौरसह इतर महत्वाच्या पदांवर अंतिम वाटणी कशी होईल, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.