नायलॉन मांजा 'उठला जीवावर' अंगठ्याच्या नसा कापल्या गेल्या

25 Jan 2026 16:43:38
पुणे,
nylon manja धनकवडी परिसरातील नागरिकांसाठी पुन्हा एकदा धोक्याची लाट निर्माण करणारी घटना स्वारगेट परिसरात घडली आहे. उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांज अडकल्याने ३० वर्षीय संकेत बोथरा गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नसा कापल्या गेल्या असून, अंगठा अर्ध्याहून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
 

nylon manja 
दोन दिवसांपूर्वी nylon manja सायंकाळी सुमारे सहा वाजता, संकेत बोथरा देशभक्त कै. केशवराव जेधे उड्डाणपुलावरून दुचाकीने जात होते, त्यावेळी पतंगाचा नायलॉन मांज त्यांच्या गळ्याला व उजव्या हाताला अडकला. मांज बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच बाजूने येणाऱ्या दुसऱ्या वाहनालाही मांज अडकल्याने प्रचंड ताण निर्माण झाला. या अचानक झालेल्या घटनेत अंगठा जखमी होऊन बोटांच्या नसा तुटल्याचे डॉक्टरांनी नोंदवले. अपघातानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संकेत यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 
 
या घटनेने शहरात संतापाची nylon manja लाट निर्माण केली आहे. नागरिकांनी बंदी असूनही नायलॉन मांजाची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरातही एका तरुणीला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली होती. आता स्वारगेटमधील घटना ही त्याच धोक्याची पुनरावृत्ती ठरली आहे.सामाजिक कार्यकर्ते अभिजीत टेंबेकर यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत म्हटले, “पतंग उडवणे हा छंद असू शकतो; मात्र नायलॉन मांजामुळे तो प्राणघातक ठरत आहे. अनेक अपघात होऊनही प्रशासन ठोस कारवाई करत नाही. अखेर दोर पतंगाची कापायची की नागरिकांचे आयुष्य?”नायलॉन मांज, जो पतंग उडवण्यासाठी वापरला जातो, अत्यंत तीक्ष्ण असल्याने मानवी जीवन, पशू-पक्षी यांच्यासाठी प्राणघातक ठरतो. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) यावर उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालली असली तरीही शहरात अशा मांजाचा सर्रास वापर होत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे धोकादायक पतंगमांजावर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत, तर सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सतत जनजागृती करत आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर अशा घातक अपघातांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0