पुणे हादरलं! सोन्याचे दागिने आणून दे.... मग पतीने केले भयानक कृत्य

25 Jan 2026 15:47:56
पुणे,
Pune murder news, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई परिसरात सोन्याच्या दागिन्यांच्या वादातून पत्नीचा पतीने चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
 
 
Pune murder news,
 
मिळालेल्या माहितीनुसार,Pune murder news,  नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय १९, रा. शिरसवडी, ता. हवेली) हिचे काही सोन्याचे दागिने काही काळापूर्वी गहाण ठेवले गेले होते. हे दागिने तिला परत मिळावीत म्हणून ती वारंवार पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी, ता. हवेली) याच्याकडे मागणी करत होती. या मागणीवरून दोघांमध्ये सतत वाद सुरू असत असल्याचे समोर आले आहे.
 
 
शनिवारी Pune murder news, आरोपी शैलेंद्रने नम्रताला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले. दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. संतप्त झालेल्या शैलेंद्रने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी चाकूने नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली नम्रता घटनास्थळीच मृत्यूमुखी पडली.घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाहरुख दस्तगीर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शैलेंद्र व्हटकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणात वापरलेला लोखंडी चाकू जप्त केला आहे. पुढील तपास सुरू असून, पोलिस घटनास्थळी उपस्थित साक्षींना चौकशी करत आहेत.परिसरातील रहिवाशांनी या घटनेवर धक्कादायक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, न्यायालयीन कारवाईनंतर योग्य त्या कायदेशीर पावले उचलली जातील असे सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0