हिंगणघाट,
Sudhir Mungantiwar संत जगनाडे महाराजांच्या नावाने निर्माण करण्यात आलेली अभ्यासिका ही केवळ सिमेंट आणि माती-विटांनी तयार झालेली इमारत नसून, गरीब व वंचित घटकांच्या उन्नतीसह विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विचार करणारे प्रेरणास्थान ठरेल. संत जगनाडे महाराजांनी दिलेल्या मानवतेच्या विचारांमध्ये समाज परिवर्तनाची ऊर्जा आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
तालुयातील बुरकोनी Sudhir Mungantiwar येथे उभारण्यात आलेल्या श्री संताजी जगनाडे महाराजांच्या अभ्यासिकेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आ. राजू तिमांडे, मिलिंद भेंडे, उमेश आष्टनकर, विनोद विटाळे, प्रवीण हिवरे, आकाश पोहाणे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्वलंत कडू, विशाल निंबाळकर, अंकूश ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचेही लोकार्पण झाले.
आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ही अभ्यासिका एकता आणि मानवतेचा विचार रुजवणारी ठरेल. संत जगनाडे महाराजांनी बुडणारे अभंग बाहेर काढले, तसे आपल्याला देखील समाजाला अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढायचे आहे. शेवटच्या माणसाच्या प्रगतीचा, उन्नतीचा विचार करायचा आहे. या अभ्यासिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आधार देणारे साहित्य, शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे साहित्य असले पाहिजे. याठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके उपलब्ध करून द्या. लाडया बहिणींना व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तके इथे असली पाहिजे, अशी अपेक्षाही आ. मुनगंटीवार यांनी व्यत केली.
वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जिल्ह्याची सेवा करण्याची संधी लाभली. महात्मा गांधींच्या कर्मभूमीतील या जिल्ह्याने जे-जे मागितले, ते देण्यासाठी कायम प्रयत्न केला. आ. समीर कुणावार यांच्या मागणीनुसार हिंगणघाटसाठी ५० कोटी आणि आर्वीसाठी २५ कोटी निधी दिला. यासोबतच वर्धा शहरासाठी १०० कोटींचा निधी देण्याचे भाग्य लाभले. वर्धा जिल्ह्याची सेवा करताना कधीही हात आखडता घेतला नाही. शब्द दिला तो पूर्ण केला. आयोजकांनी मांडलेल्या मागण्यांसाठीही आम्ही पूर्ण शतीने सोबत आहोत, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यत केला.
संत जगनाडे महाराजांचे टपाल तिकीट
संताजी जगनाडे महाराज यांचे Sudhir Mungantiwar टपाल तिकीट काढण्याचे भाग्य मला लाभले. त्यांचे सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) जन्मस्थान तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी आणि त्यासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही भाग्य मला लाभले, याचा विशेष आनंद आहे, अश्या भावनाही आ. मुनगंटीवार यांनी व्यत केल्या.
.