नव्या पिढीवर जीवनमूल्य रुजणे गरजेचे : डॉ. वैशाली पांडे

25 Jan 2026 18:34:14
तभा वृत्तसेवा पुसद,
Vaishali Pandey श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद येथे विद्यार्थिनी मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या परिषद सभागृहात राजमाता जिजाऊ आणि युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अंजली पांडे तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संस्कृत विभागप्रमुख डॉ. वैशाली पांडे, महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख, विद्यार्थी मंडळाच्या समन्वयक डॉ. रंजना जीवने, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वप्ना देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
 

Vaishali Pandey 
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अंजली पांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. विक्रांत मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. वैशाली पांडे यांचे स्वागत इतिहास विभागप्रमुख डॉ. नारायण वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. बुद्धीचा वापर केला नाही तर मेंदूला गंज लागते. जे इतरांसाठी जगतात तिच खरी माणसं असतात. कर्मनिष्ठा, नीतीमत्ता कर्मयोग सिद्धांत सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. वैशाली पांडे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आज देशाची आणि समाजाची परिस्थिती अत्यंत वाईट स्वरूपाची आहे. याचा अर्थ असा नव्हे की सर्वच काही वाईट आहे, चुकीची आहे. मात्र काही गोष्टी चांगलेही आहेत. सध्या नवीन पिढी कुठेतरी भरकटत आहे. या पिढीला निराशा येत आहे. वाट चुकत आहे. मात्र आज जी मूल्य रुजायला पाहिजे ती रुजत नाही. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
‘एका वसुंधरेची हाक’ यावर निबंध स्पर्धेतील विद्यार्थिनी प्रज्ञा अश्वजित कांबळे, मनीषा वामन शामसुंदर, दीक्षा बंडू कांबळे, राजश्री गजानन सुफलकर यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. रामकृष्ण विवेकानंद संस्कार केंद्र पुसद यांच्यावतीने राष्ट्रीय योग दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये संस्कृती काळेला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. अंजली पांडे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. रंजना जीवने यांनी केले. सूत्रसंचालन शर्वरी भागवतकर, तर आभारप्रदर्शन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. स्वप्ना देशमुख यांनी केले.
Powered By Sangraha 9.0