वाशीम,
sickle cell anemia, सध्या राज्यात अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान राबविले जात आहे. सिकलसेल रक्तविकार वेळीच लक्षात आल्यास त्यावर उपचार करणे सोपे जाते. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न ठेवता रक्ताची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.रिसोड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रिठद येथे २४ जानेवारी त्यांनी रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राच्या कामकाजाची पाहणी करून विविध योजनांचा आढावा घेतला.
प्रसूती सेवेचा ’रिठद पॅटर्न’ चर्चेत
या भेटीदरम्यान आरोग्य केंद्राच्या प्रसूती विभागाची आकडेवारी पाहून मंत्री महोदयांनी आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले. या केंद्राचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी झाले होते. तेव्हापासून आजवर येथे ३२ प्रसूती यशस्वीपणे पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील ३१ प्रसूती एकट्या आरोग्य सेविका अनिता कुटे यांनी केल्या आहेत. अत्यंत कमी मनुष्यबळ असतानाही अनिता कुटे यांनी दाखवलेले हे समर्पण आणि तत्परता पाहून जाधव यांनी त्यांचे कौतुक केले व ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा हा आदर्श असल्याचे सांगितले.
आरोग्य योजनांचा आढावा
केंद्रातील प्रसूती सुविधेसोबतच क्षयरोग निर्मूलन आणि सिकलसेल तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या आरोग्य योजना पोहोचवता येतील, यावर त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली.
जनतेला आवाहन
सिकलसेल चाचणीसाठी घाबरण्याचे अजिबात कारण नाही. आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात ही चाचणी मोफत उपलब्ध आहे. सुरक्षित भविष्यासाठी सर्वांनी ही तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी केले. यावेळी डॉ.विजय बल्लाळ, डॉ.भाग्यश्री कवर यांच्यासह सिकलसेल मुक्त भविष्यासाठी चाचणी करून घ्यावी : प्रतापराव जाधव