सर्व काही उद्धवस्त- सुप्रिया सुळे

28 Jan 2026 11:59:40
बारामती,
Supriya Sule महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचा आज सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून बारामतीचे वातावरण शोकाकूल बनले आहे.वार्तानुसार, अजित पवार आज सकाळी नियोजित सभेसाठी बारामतीसाठी रवाना झाले होते. विमानतळावर विमान लँडिंगसाठी उतरू लागल्यावर हेलकावे खात ते खाली कोसळले. अपघात शेजारील शेतात झाला. सकाळी सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास हा दुर्घटना घडली. या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सहकारी, दोन पायलट आणि अन्य दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.
 

Supriya Sule 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले Supriya Sule  की विमान लँडिंगसाठी आधी एक फेरी मारत होते, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये मोठा आवाज आला आणि लगेचच स्फोट झाला. एकामागून एक स्फोट झाल्याने आसपासच्या लोकांना मदतीस धावता आले नाही. स्थानिकांनी तत्काळ आपत्कालीन यंत्रणांना फोन करून माहिती दिली.अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक नेते आणि कार्यकर्ते धक्का बसून रडू लागले. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर "Devasted – उद्धवस्त" असे लिहून दु:ख व्यक्त केले. पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाने पक्षाला आणि पवार कुटुंबियांना असलेले नुकसान व्यक्त केले.
बारामतीकर आणि Supriya Sule  राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठी हा धक्का अतिशय जबरदस्त ठरला आहे. पवार कुटुंबियांसाठी हा अपघात अपूरणीय हानी ठरली आहे, तर पक्षाच्या नेत्यांसाठी देखील हा एक अत्यंत दुःखद प्रसंग आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहचून मदत कार्य सुरु केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक धडाडीचे आणि रोखठोक नेते मानले जात होते. त्यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय वातावरणात मोठा शोककळा पसरली आहे.
Powered By Sangraha 9.0