अ‍ॅरिझोनाच्या पर्वतांमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, चार जणांचा मृत्यू

03 Jan 2026 13:06:29
वॉशिंग्टन, 
helicopter-crash-in-mountains-of-arizona अ‍ॅरिझोनाच्या पर्वतांमध्ये हेलिकॉप्टर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पिनल काउंटी शेरिफ ऑफिसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास फिनिक्सच्या पूर्वेला सुमारे १०३ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेलिग्राफ कॅन्यनजवळ हा अपघात झाला.
 
helicopter-crash-in-mountains-of-arizona
 
शेरिफ ऑफिसनुसार, हेलिकॉप्टरमधील सर्व चारही जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ५९ वर्षीय पायलट, २१ वर्षीय दोन महिला आणि २२ वर्षीय आणखी एक महिला यांचा समावेश आहे. helicopter-crash-in-mountains-of-arizona फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन (एफएए) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) अपघाताची चौकशी करत आहेत.
Powered By Sangraha 9.0