कायदेविषयक जनजागृतीने विद्यार्थ्यांमध्ये हक्क-कर्तव्यांची जाणीव

03 Jan 2026 16:58:28
वाशीम,
legal awareness program जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम व जिल्हा विधिज्ञ मंडळ, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी २०२६ रोजी रेखाताई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाशीम येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
 

legal awareness program, student rights and duties, Waishim district 
समाजातील विविध घटकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे व विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या राज्यगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व्ही. जी. चौखंडे, उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना हुंडा प्रतिबंध कायदा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून सामाजिक कुप्रथांना आळा घालण्यासाठी कायद्याची भूमिका स्पष्ट केली.यावेळी अ‍ॅड. वैभव तिफने यांनी पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन करून पर्यावरण संरक्षणात नागरिकांची भूमिका अधोरेखित केली. तसेच अ‍ॅड. परमेश्वर शेळके यांनी बालविवाह प्रतिबंध व पोसो कायदा याविषयी सखोल माहिती देत विद्यार्थ्यांना कायद्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास प्राचार्य आर. एम. आरू, जिन्साजी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. सी. लादे यांनी केले तर आभार एस. आर. भांदुर्गे यांनी मानले.
या कार्यक्रमास रेखाताई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायदेविषयक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व कायदेशीर साक्षरता वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.
Powered By Sangraha 9.0