प्रयागराज,
magh-mela-in-prayagraj ३ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे त्रिवेणी संगमाच्या पवित्र तीरावर माघ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात देश-विदेशातून लाखो भाविक संगमात पवित्र स्नान करून आध्यात्मिक पुण्य लाभासाठी प्रयागराजकडे येणार आहेत. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमस्थळी भक्ती, श्रद्धा आणि तपश्चर्येचे अद्वितीय दर्शन घडणार आहे.
हिंदू धर्मात माघ महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात नदीस्नान, दानधर्म आणि संयमित जीवन पाळल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. magh-mela-in-prayagraj याच पार्श्वभूमीवर २०२६ चा माघ मेळा पौष पौर्णिमेपासून सुरू होऊन महाशिवरात्रीपर्यंत चालणार असून संपूर्ण परिसर अध्यात्मिक ऊर्जेने भारलेला राहणार आहे.
या वर्षी माघ मेळ्याची सुरुवात ३ जानेवारी २०२६ रोजी पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाने होईल. magh-mela-in-prayagraj त्यानंतर मकर संक्रांती (१४ जानेवारी), मौनी अमावस्या (१८ जानेवारी), वसंत पंचमी (२३ जानेवारी), माघी पौर्णिमा (१ फेब्रुवारी) आणि शेवटी महाशिवरात्री (१५ फेब्रुवारी) अशा एकूण सहा प्रमुख स्नान पर्वांचा समावेश असणार आहे. या दिवशी संगमावर विशेष धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि साधू-संतांच्या उपस्थितीत भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
धार्मिक दृष्टिकोनातून ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. magh-mela-in-prayagraj पहाटे सुमारे ४ ते ५.३० या वेळेत संगमात स्नान आणि दान केल्यास त्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या वेळेत संगमावर भाविकांची मोठी वर्दळ असते.
माघ मेळ्यात ‘कल्पवास’ ही परंपरा देखील महत्त्वाची मानली जाते. पौष पौर्णिमेपासून संगमाच्या काठावर राहून कल्पवासी एक महिना संयम, जप, ध्यान आणि नियमित स्नान करत साधे व शुद्ध जीवन जगतात. पुराणांनुसार माघ स्नान हे हजारो यज्ञांइतके फलदायी मानले जाते आणि ते भक्ताला पापमुक्त करून मोक्षमार्गाकडे नेते.
माघ मेळ्यातील सर्वात खास आणि पवित्र दिवस म्हणून मौनी अमावस्येला विशेष स्थान आहे. magh-mela-in-prayagraj १८ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या स्नानासाठी सर्वाधिक भाविक प्रयागराजमध्ये दाखल होतात. या दिवशी मौन पाळून संगमात स्नान केल्यास मानसिक शांती मिळते आणि आत्मिक शुद्धी साधते, अशी श्रद्धा असल्याने हा दिवस माघ मेळ्याचा कळस मानला जातो.