नागपूर,
Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी रमेश मेहर यांनी ३५ वर्षांची प्रामाणिक सेवा पूर्ण करून ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या निमित्ताने एक दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात भजन, नामस्मरण, प्रार्थना व महाआरती . सामुदायिक ध्यान, विजय ग्रंथाचे पारायण, भजन, नामस्मरण, प्रार्थना व महाआरती असे विविध धार्मिक उपक्रम पार पडले.
गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे छायाचित्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. Nagpur University या कार्यक्रमाला विद्यापीठातील कर्मचारी, हावरापेठ मित्र परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल चकोले यांनी केले तर आभार प्रदर्शन पराग मेहर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवंदनाने करण्यात आला.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र