कारंजा लाड,
police day celebration, विद्यार्थ्यांनो आपल्या जीवनाचे ध्येय गाठायचे असेल तर मोबाईल पासून दूर राहा. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम हे आपला अमूल्य वेळ गमावतात व आपल्या ध्येयापासून दूर नेतात, त्यामुळे मोबाईल पासून दूर राहा, असे प्रतिपादन करंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी रेझिंग डे निमित्त बोलताना केले.
बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी येथे रेझिंड डे साजरा करण्यात आला. २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पोलिस स्थापना दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे, दीपक ढोबळे, पोलिस पाटील सुनील ठाकरे, सरपंच प्रतिनिधी परमेश्वर आमले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाणेदार प्रवीण शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी सत्कार केला. उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रमुख मार्गदर्शक ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पोलिस स्थापना दिवसाबद्दल माहिती देऊन पोलिस हे आपले मित्र कसे आहेत, हे पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे कारण शोशल मीडिया आपला अमूल्य वेळ गमावतात त्यामुळे आपण आपल्या ठरवल्या ध्येयापासून दूर जातो. म्हणून मोबाईलचा वापर टाळावा असे आवाहन केले.
अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक विजय भड यांनी ठाणेदार प्रवीण शिंदे यांचे विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा मंत्र दिल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन राजेश शेंडेकर तर आभार अनिल हजारे यांनी मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वर्ग ८, ९ व १० चे विद्यार्थी उपस्थित होते.