पुणे
Ajit Pawar Last Meeting राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे पुण्यासाठी असलेले अपार प्रेम आणि विकासाबाबतचे ध्येय अखेर शेवटच्या क्षणीही जिवंत होते. मंगळवारी (२७ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयात पुण्याच्या विकासकामांसाठी खास बैठक घेतली. ही बैठक त्यांच्या पुण्यासाठी घेतलेली शेवटची बैठकन ठरली.
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूककोंडी आणि इतर महत्त्वाच्या विकासकामांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पुण्याच्या विकासासाठी कायम सहकार्य करणारे अजित पवार यांनी शहराच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमधून त्यांचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी यावेळी नमूद केले की, "पुण्याचा विकास थांबता कामा येऊ नये, हा त्यांचा कायमचा ध्यास होता."
विकास थांबू नये
महापालिका निवडणुकीच्या Ajit Pawar Last Meeting काळात अजित पवार यांनी पुण्याच्या पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व्यवस्था आणि वाहतूककोंडी या मुद्यांवर जोरदार प्रचार केला होता. त्यांनी पक्षाच्या प्रचारात सक्रिय भूमिका घेतली, ज्यामुळे निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मात्र, अपेक्षित यश मिळाले नाही; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला २७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ३ जागा मिळाल्या.निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्यामुळे अजित पवार यांनी पुण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विकासकामांची दिशा ठरवली, तसेच विभागीय आयुक्त आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या. प्रचार काळात त्यांनी मेट्रो आणि बससेवा मोफत देण्याची योजना जाहीर केली होती; त्यांच्या अकाली निधनामुळे पुणेकरांना ही योजना प्रत्यक्षात दिसणार नाही, परंतु त्यांनी आखलेले विकासस्वप्न पुढे नेण्याची जबाबदारी आता पुण्यातील शिलेदारांवर आली आहे.
अजित पवार हे पुण्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले. शहराच्या आधुनिक जडणघडणीमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि प्रशासनावर पकड असूनही त्यांनी कधीही तडजोड न करता पुण्याचे हित पाहिले. आता त्यांच्या अनुयायांना आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या आखलेल्या मार्गावर ठाम राहून पुण्याच्या विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. विकासकामातील शिस्त आणि ध्यास या वारशाला चालना देणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.काही योजनेसाठी सुद्धा दादा कटिबद्ध झाले होते