अजित दादांचा निधनानंतर कोण होणार पुण्याचे पालकमंत्री? चर्चेचा गदारोळ

    दिनांक :30-Jan-2026
Total Views |
पुणे,
Pune Guardian Minister राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानं राज्यभर शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यात पक्षाचा दबदबा असलेले आणि जिल्ह्याचे प्रशासकीय तसेच राजकीय काम पाहणारे अजित पवार यांच्या निधनानंतर आता पुणे जिल्ह्याची राजकीय दिशा कोण सांभाळणार, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
 

Pune Guardian Minister  
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा Pune Guardian Minister दबदबा बऱ्याच वर्षांपासून आहे. पक्षाने कालांतराने राज्यभर आपली पकड मजबूत केली असून, अनेक मातब्बर नेते तयार केले आहेत. पुणे जिल्ह्यातही पक्षाने पंचायत समितीपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. प्रशासनावर पकड, विकासाचा अजेंडा आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यात अजित पवार यांचा विशेष सहभाग होता. ते दर आठवड्याला जिल्ह्यातील बैठका घेऊन स्थानिक प्रश्नांवर लक्ष ठेवत, नेत्यांना मार्गदर्शन करत आणि विकासाच्या कामांना गती देत असत.
 
 
अजित पवारांच्या निधनानंतर Pune Guardian Minister उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे जाण्याची चर्चा जोर पकडत आहे, तर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणास दिलं जाईल, यासंबंधीही राज्यभर राजकीय चर्चांना गती मिळाली आहे. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे असलेले असल्याने आता मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्व कुणाला या जबाबदारीसाठी योग्य समजेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
 
राजकीय वर्तुळात या पदासाठी विविध नेत्यांची नावं चर्चेत आहेत. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सध्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असून, त्यांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही अनुभव असून, त्यांना हे पद देण्याची शक्यता चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळापासून पुणे जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवले आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या देखरेखीखाली राहणार असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही.
 
 
 
राजकीय तज्ज्ञांच्या मते, पुणे जिल्हा राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान ठेवतो. त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी अनुभवी, प्रभावी आणि स्थिर नेतृत्वाची गरज आहे. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पक्षासाठी ही जबाबदारी केवळ राजकीय नाही, तर प्रशासनिकदृष्ट्याही संवेदनशील ठरणार आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि लवकरच कोणत्या नेत्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाईल, हे स्पष्ट होईल.